fbpx

भाजपने उमेदवारी दिली नाही, तरी मी अपक्ष लढणार : संजयमामा शिंदे

टीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभेला माढा मतदार संघातून मी निवडणूक लढवावी असा आग्रह भाजपच्या काही नेत्यांनी माझ्याकडे धरला आहे. पण लोकसभा लढवण्याची माझी इच्छा नाही. मी करमाळा विधानसभेसाठी इच्छुक आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला मी करमळ्यातून शंभर टक्के उभा राहणार आहे. मला अशा आहे की, भाजपकडून मला उमेदवारी मिळेल अशी अशा आहे. पण ऐनवेळी भाजपने उमेदवारी दिली नाही तर मी अपक्ष का होईना, करमाळा विधानसभेची निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच, अशी प्रतिकिया सोलापूर जि.प. अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

यावेळी संजयमामा शिंदे म्हणले, सध्या मी भाजपसोबतच आहे. मी भाजप पुरस्कृत उमेदवार आहे. करमाळा विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मी तयारी सुरु केली आहे. पण समजा भाजप-शिवसेना युती झाली तर करमाळा विधानसभा मतदार संघ हा शिवसेनच्या वाट्याला जाईल. त्यावेळी मात्र माझी पंचाईत होणार आहे. त्यामुळेच भाजपामधील अधिकृत प्रवेश मी काहीसा लांबवला आहे.

शरद पवार मला भेटायला आणि भाजपवाले मला माढा लोकसभेची निवडणूक लढायला सांगत आहेत. परंतु मी शरद पवार यांनी भेटायला गेलो नाही आणि माढा लोकसभा सुद्धा लढणार नाही. संजायमा शिंदे यांनी सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

2 Comments

Click here to post a comment