भावाच्या लग्नाला मी नक्की जाणार : आदित्य ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा 27 जानेवारीला विवाह आहे.विवाहाची जय्यत तयारी सुरु असून राज ठाकरेंनी स्वतः मातोश्रीवर जाऊन त्यांचे बंधू उद्धव ठाकरेंना लग्नाचं निमंत्रण दिलं आहे.मात्र निमंत्रण दिले तरी उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय या विवाह सोहळ्याला हजेरीलावणार का हा चर्चेचा विषय ठरला होता.

Loading...

अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा गेल्या वर्षी डिसेंबर 2017 मध्ये पार पडला.आदित्य ठाकरे देखील या लग्नाला जाणार का, याबाबत तरुणांमध्ये चर्चा होती. पण लग्नाला मी नक्की जाणार असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलंय.

ठाकरे कुटुंबाची नवी पिढीअमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल तरुणाईमध्ये नेहमीच आकर्षण असतं. आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. तर अमित ठाकरेही आता राजकारणात सक्रिय होत आहेत. आदित्य ठाकरे यांना अमितच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “अमितच्या लग्नाला नक्की जाणार, जायलाच लागणार असं म्हटलंय.Loading…


Loading…

Loading...