आमदार होण्यापासून मला कूणीच रोखू शकत नाही : आशाताई बुचके

टिम महाराष्ट्र देशा :  विधानसभा निवडणुकीत मी दोन वेळा पिछाडीवर गेले. आज जरी मी दोन पाऊलं मागे गेले असले तरी या आगामी विधानसभा निवडणुकीत मी ती उंची नक्की गाठणार आहे. असं  वक्तव्य आशाताई बुचके यांनी जून्नर तालुक्यातील अंबोली या आदिवासी गावातील यात्रे निमित्त केल.

आदिवासी गावातील प्रश्न सोडवण्यासाठी मी गेली पंचवीस वर्षे कटिबद्ध आहे. पिण्याचा प्रश्न असेल , रस्ते असतील, वीज असेल इत्यादी विकासात्मक कामे पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच अग्रभागी राहीलेली आहे. अंबोली आदिवासी भागात मोबाईल टाॅवर बसवून देण्याचेही आश्वासन बुचके यांनी दिले.पूढील वर्षीची आगामी विधानसभा निवडणुक जून्नर भागातील लक्षवेधी होणार यात शंका नाही मात्र आमदार होण्यापासून मला कूणीच रोखू शकत नाही असं देखील त्या म्हणाल्या .