रावसाहेब दानवे यांना पराभवाची धूळ चारू : बच्चू कडू

danave vr bachu kadu

टीम महाराष्ट्र देशा- अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. इतकेच नाही तर आपण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पराभवाची धूळ चारू अशीही गर्जना त्यांनी केली. रावसाहेब दानवे यांनी दीड वर्षापूर्वी शेतकऱ्यांचा साले असे म्हणत त्यांच्यावर शेरेबाजी केली होती. त्याचीही आठवण कडू यांनी करून दिली. इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं बच्चू कडूंनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दानवे यांना पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पण त्यांनी केला आहे. दानवेंच्या मतदारसंघाची अवस्था बिहारपेक्षा वाईट असल्याची टीका त्यांनी केली. दानवेंच्या मतदारसंघात रेतीची तस्करी चालते, अवैध दारु विक्री चालते, अशा शब्दांमध्ये त्यांनी दानवेंवर तोंडसुख घेतलं.

शेतकऱ्यांना शिव्या घालणाऱ्या दानवेंच्या अंगाची सालपटे काढल्याशिवाय राहणार नाही- बच्चू कडू