‘राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं डिपॉजीट मीचं जप्त करणार’

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि राम शिंदे यांच्या सामना होणार आहे. राम शिंदे हे सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. तर रोहित पवार हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने या मतदारसंघात संपूर्ण ताकद लावलेली आहे.

भाजपचे खासदार सुजय विखे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाविषयी भाष्य केले आहे. विखे यांनी ‘ज्या पवार कुटुंबीयांनी आम्हाला गेल्या ३० वर्षे त्रास दिला. आता आम्ही त्यांच्या उमेदवाराचे डिपाझीट जप्त करण्याची जबाबदारी घेतली आहे. अस विधान केले. तसेच जिल्ह्यासह मतदारसंघाच्या विकासासाठी तालुक्यातील सुपुत्राची गरज आहे, बाहेरच्यांची नाही असंही विखे म्हणाले आहेत.

सुजय विखे हे जामखेड येथे आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. पुढे बोलतानासुजय यांनी ‘विखे कुटुंब अनेक पिढ्यांपासून सर्वसामान्यांच्या हितासाठी समाजसेवा करत आहे.मात्र आम्ही कधीही फोटो काढून ते फेसबुकवर टाकले नाहीत असा टोलाही रोहित पवारांना लगावला आहे. या मतदारसंघात सुजय विखे यांनी विशेष लक्ष घातल्याने चुरस वाढली आहे.

दरम्यान, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या मदतीसाठी रोहित यांचे काका आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरले आहेत. आज कर्जत येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा ‘निर्धार मेळावा’ होणार यामधून ते प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यांच्यासह खासदार अमोल कोल्हे हेही मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या