मी पार्थ पवारांचा नाही, तर पवार घराण्याचा पराभव करणार : बारणे

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मे ला जाहीर होत आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक अतीतटीच्या लढती होत आहेत’ त्यात मावळ लोकसभा मतदारसंघातील पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांच्या लढतीचा समावेश आहे.

याविषयी, मावळ मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पत्रकारांशी बोलताना ‘मला पार्थ पवारांचा नाही, तर पवारांच्या घराण्याचा पराभव करायचा आहे’, असं विधान केले आहे. पुढे बोलताना त्यांनी ‘विजय मिळावा म्हणून कोणत्याही देवाला नवस केलेला नाही. पण मी दीड लाख मतांनी निश्चित विजयी होणार’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच ‘निवडणूक निकालाबाबत मला कसलाही सभ्रम नाही. मी टेंशन घेणारा नाही, तर टेंशन देणार माणूस आहे’, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे मावळमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली पूर्ण ताकद या मतदारसंघात लावली आहे.Loading…
Loading...