माढ्यातुन राष्ट्रवादीचा मीच ऊमेदवार असणार – आ. शिंदे

कुर्डूवाडी /हर्षल बागल : आगामी 2019 च्या विधानसभेला माढ्यातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आगामी ऊमेदवार मीच आहे. आणि निवडणुन पण येणार असा आत्मविश्वास सलग चार वेळा विधानसभा सदस्य राहिलेले माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी दाखवला आहे. कुर्डूवाडी येथे पंचायत समिती च्या सभागृहात दुष्काळ निवारण बैठकीला आल्यानंतर पत्रकारांशी सवांद साधल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले.

लोकशाहीमार्गाने मतदान प्रकिया होते. मी स्वता ऊभा राहणे अन मी एखाद्याला मतदान करा म्हणुन सांगणे खुप फरक  आहे. त्यामुळे येणाऱ्या काऴात चर्चा काहीही होत असली तरी मीच पक्षाचा ऊमेदवार असेल आणी पक्ष लोकसभेला जो ऊमेदवार देईल त्याला निवडुण आणण्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करणार असल्याचे स्पष्टीकरण आ. शिंदे यांनी दिले.

सध्या पाण्यावरुन राजकारण होत आहे का न्यायालयात गेल्यावर पाणी शेवटपर्यंच मिळेल का ? असे विचारले असता पाण्यासाठी आंदोलने हे प्रसिद्धीसाठी आंदोलने आहेत. न्यायालयात जाऊन पाणी मिळणार नाही. लोकशाही मार्गाने पाणी वाटप झालं पाहिजे . फोडाफोडी न करता पाणी घ्यावे. असेही आ. बबनराव शिंदे यांनी पत्रकारांना बोलताना सागिंतले.