धोनीनंतर मी होणार कर्णधार; जडेजाने केली ‘मन की बात’

dhoni

नवी दिल्ली : आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ दुबई येथे पोहचला आहे. संघाची सरावात जोरदार तयारी सुरु आहे. सीएसके सध्या अंक तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाल्यानंतर आता तो लवकरच आईपीएललाही अलविदा म्हणू शकतो. त्याचा जागी कोण असेल ही चर्चा सुरु असताना जडेजाने आपले नाव घेतले आहे.

चेन्नईचे नेतृत्व धोनीनंतर कोण करेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान ट्वीटरवर धोनीच्या नंतर कर्णधार कोण असेल ? अशा एका प्रश्नाला उत्तर देताना जडेजाने ८ असे उत्तर दिले. ८ हा जडेजाचा जर्सी नंबर आहे. यामुळे त्याला माहीनंतर कर्णधार बनण्याची इच्छा असल्याचे दिसत आहे. जडेजाने तो रिप्लाय नंतर डिलीट केला. मात्र फॅन्सनी आधीच त्याचा स्क्रीनशॉट घेतला होता. जडेजाचा या रिप्लायचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या हंगामाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळणार आहे. जडेजाने पहिल्या टप्प्यात दर्जेदार कामगिरी केली आहे. त्याने झालेल्या ७ सामन्यांमध्ये १३१ धावा केल्या आहेत. तसेच ६ विकेट्सही घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या