अजितदादांसोबत मी विधानसभेत असेल; रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणूक उत्साहात पार पडली. तसेच उद्या ( ता. २४ ) निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कार्यकर्त्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले उमेदवार चांगलेच सक्रीय होताना पाहायला मिळाले. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी कुटुंबीयांसह वेळ घालवला आणि विजयाचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘निकालाआधी मिळालेला वेळ हा पूर्णपणे कुटुंबीयांसोबत घालवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. तर निवडणूक आयोगाने दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्याची संधी दिल्याचं सांगत अजित दादांसोबत सभागृहात बसण्याचा आनंद वेगळाच असेल, असे म्हणत विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ओपिनियन आणि एक्झिट पोलचे सर्व अंदाज मोडून काढत राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल अस विधान केले आहे. त्यामुळे निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या