मी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : मीच मुख्यमंत्री होणार, मी फक्त भाजपाचा नाही, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्याचा निर्धार व्यक्त केला. ही निवडणूक युतीच्या माध्यमातूनच लढणार, याबद्दल शंका बाळगू नका, हे सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणला आहे. आपल्या मित्रपक्षामध्ये बऱ्याच लोकांना बोलायची खुमखुमी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. पुढची पाच वर्षं दुष्काळमुक्ती हेच ध्येय असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कुठलाही संभ्रम मनामध्ये ठेऊ नका, आपण ही निवडणूक युतीमध्येत लढणार आहे, ही निवडणूक आपण युतीतच लढणार आहोत, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. युतीमध्ये लढत असताना कोणत्या जागा आपल्या आणि कोणत्या जागा मित्रांच्या याचा निर्णय लवकरच होणार, असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.