मी मुख्यमंत्री बनणार – कमल हसन

टीम महाराष्ट्र देशा – ‘मी सक्रिय राजकारणात उतरणार असून तामिळनाडूचा मुख्यमंत्रीही बनणार आहे’, असं वक्तव्य प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी केलंय. कमल हसन यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही घोषणा केली.कमल हसन लवकरच सक्रीय राजकारणात येणार आहे. गेल्या काही दिवसात कमल त्यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे चर्चेत आहे.

काल जोरदार पावसानं चेन्नईला झोडपून काढलं. त्यामुळे चेन्नईच्या अनेक भागात पाणी साचलं आहे. या परिसरात रोगराई पसरू नये म्हणून कमल हसन यांनी वाढदिवसाचं औचित्य साधून या भागांमध्ये वैद्यकीय शिबिरांचं आयोजन केलं आहे. ‘माझ्या वाढदिवसानिमित्त केक कापू नका. तर पूरस्थितीचा सामना करावा लागणाऱ्या लोकांना मदत करा’, असं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं आहे.