मी कालही विद्यार्थ्यांसोबत होतो, आजही आणि उद्याही राहणार: उदय सामंत

Uday Samant

मुंबई: देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व जिल्ह्यातली जिल्हधिकारी, पालकमंत्री, प्रशासन आपआपल्या पद्धतीने पुन्हा एकदा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेत आहेत.असे असताना राज्यात परीक्षेवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी १३ अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी परीक्षा न घेण्यासंदर्भात निवेदन दिल्याचे सांगितले होते. आता यावरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे चांगलेच कचाट्यात सापडत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. भाजपाचे कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या चुकीच्या दाव्यांमुळे त्यांना पदावरून तात्काळ दूर करावे अशा मागणीचे पत्रच थेट राज्यपालांना लिहिले आहे.

राजस्थानच्या राजकारणाचा राज्यात परिणाम, कॉंग्रेसच्या ‘या’ झुंझार नेत्याची होणार हकालपट्टी ?

दरम्यान, आता यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील यावर भाष्य केले आहे. उदय सामंत यांनी, ‘ अशी कितीही पत्र द्या माझ्या भूमिकेत बदल होणार नाही.. कालही विद्यार्थ्यांसोबत होतो, आज ही आहे आणि उद्या ही राहणार.. अतुलजींना शुभेच्छा…’, अशा शब्दांत ट्विट करत त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

तिर्थक्षेञी कुणीही उपाशी राहत नाही ही प्रतिमा कोरोना मुळे बदलली…भिकारी झाले गायब

तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात आमदार अतुल भातखळकर म्हणतात, ‘ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी दावा केला होता कि, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही असे निवेदन केले आहे. आज नागपूर, अमरावती व गोंडवाना विद्यापीठांच्या कुलगुरूंनी स्पष्टपणे सांगितले आहे कि असे कुठल्याही प्रकारचे निवेदन त्यांनी दिलेले नाही.’

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के

तसेच, सामंत हे अंतिम वर्षांच्या परीक्षा न घेण्यावरून सुरुवातीपासूनच राजकारण करत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. तर शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार लक्षात न घेता ते राजकीय व पक्षीय दृष्टिकोनातून या विषयावर निर्णय करत आहेत, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आता अंतिम वर्षांच्या परीक्षेचा विषय आता राजकीय प्रतिष्ठेचा झाला असला तरी एकबाजूला अंतिम वर्षाचे विद्यार्थी व त्यांचे पालक हे संभ्रमात असून अशा गंभीर परिस्थितीमध्ये सामोपचाराने राज्य व केंद्र सरकारने घ्यावा, असे मत विद्यार्थी व पालक व्यक्त करत आहेत.