मी देखील लैंगिक अत्याचाराची बळी- पुनम महाजन

पुथ्वीतलावरील प्रत्येक महिला ही लैंगिक अत्याचाराची बळी आहे. भारतातील महिलांना तर लैंगिक अत्याचाराचा सामना करावाच लागतो. असे मत भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी व्यक्त केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-अहमदाबाद (आयआयएम-ए) येथील रेड ब्रिक समिटमध्ये महाजन बोलत होत्या.

मी कॉलेज मध्ये असताना वर्सोवा ते वरळी लोकलने जात असत त्यावेळी अनेक वेळा माझ्याकडे वाईट नजरने पाहिले जात पण मला कधीच स्वताची लाज वाटली नाही. कारण चुक माझी नव्हतीच .प्रत्येक महिलेला  कधीना कधी अयोग्यरीत्या स्पर्श केला जातो.

पुरुष राजकारणात काही गोष्टी सहज घेऊ शकतात पण महिला मात्र कोणत्याच गोष्टीला सहज घेऊ शकत नाही.आमच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे आणि आम्हाला ती दाखवायलाच हवी. अमेरिकेसारख्या प्रगत देशापेक्षा आपण काही गोष्टीत त्यांच्या पेक्षा पुढे आहोत जसे की आपल्याकडे महिला प्रत्येक पद भूषवितात मुख्यमंत्री असोवा पंतप्रधान, संरक्षण मंत्री महिलांनी सर्व बंधने जुगारून खूप मोठी झेप घेतली आहे. हिंदी चित्रपटातील महिला महिलांची प्रतिमा खराब करीत आहे.असे मत पूनम महाजन यांनी व्यक्त केले. ‘ब्रेकिंग द ग्लास-कमाल’ या विषयावर महाजन बोलत होत्या.