मला पक्षाबाहेर ढकललं जातंय : एकनाथ खडसे

eknath khadse

रावेर: मला पक्ष सोडायची इच्छा नाही. गेली ४० वर्षे मी भाजपसाठी काम करत आहे. पण जर पक्षानेच मला दूर केले, तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, पक्ष सोडायला भाग पाडू नका, राजकारणात काहीही शक्य असते, असे सूचक विधान करत एकनाथ खडसेंनी भाजपला इशारा दिला. आणि त्यांनी एका हिंदी गाण्याच्या काही ओळी सांगत व्यथा मांडली. ‘रहते थे कभी जिनके दिल में, हम जान से भी प्यारो की तरह. बैठे है उन्हीके कूंचे मे हम आज गुनहरगारों की तरह’, या गाण्याचा उल्लेख केला.

Loading...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील यांच्या एकसष्टी गौरव सोहळ्यात एकनाथ खडसे उपस्थित होते. व्यासपीठावर खडसे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण एकत्र आले. उभय नेत्यांमध्ये चर्चाही झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. भोसरी एमआयडीसी प्रकरणानंतर मंत्रिपद सोडावे लागल्याने नाराज झालेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर तोफ डागली. ‘आपण पक्ष सोडणार नाही. मात्र पक्ष सोडायला जर तुम्ही मला भाग पाडाल तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, असा सुचक इशाराही त्यांनी दिला आहे. आपण अशा काय भानगडी केल्यात, माझ्याबद्दल जाणून घेण्याची जनतेच्या मनात उत्सूकता आहे. गुन्हेगार असेल तर आपल्याला तुरुंगात टाका, असे खुले आव्हान खडसेंनी यावेळी दिले. आपण कुठे पैसा कमविला, कुठे भ्रष्टाचार केला, हे आपल्याला पक्षाकडून उत्तर हवे आहे. असेही ते म्हणाले.Loading…


Loading…

Loading...