‘मला ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती,मात्र तरीही मी कॉंग्रेस सोडली नाही’

congress-bjp

जयपूर- राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष डॉ. सीपी जोशी यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासहित 19 आमदारांना नोटिस जारी केली. याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज (सोमवारी) पुन्हा सुनावणी होणार आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता काँग्रेसच्या आमदारांनं सचिन पायलट यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उपमुख्यमंत्री असताना सचिन पायलट यांनी ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा दावा काँग्रेसचे आमदार गिरीराज सिंह यांनी केला आहे.

काँग्रेसचे आमदार गिरीराज सिंह नेमकं काय म्हणाले?

”मी रेकॉर्डिंग केलेली नाही. रेकॉर्डिंग करण्याबद्दल माहिती नाही. ना मी कधी खोटे आरोप लावत नाही. भाजपावाल्यांनी माझ्यासोबत कधीही चर्चा केली नाही. विरोधी पक्षातील आहेत म्हणून खोटे आरोप लावणं हे चुकीचं आहे. माझी चर्चा सचिन पायलट यांच्याशी झाली होती. त्यांनी पैशाबद्दल चर्चा केली. ते म्हणाले होते जितके हवे तितके पैसे घ्या असं म्हणाले होते. ३५ कोटींची ऑफर देण्यात आली होती. ते उपमुख्यमंत्री असताना दोन तीन वेळा माझी त्यांच्यासोबत भेट झाली होती. मी त्यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना यांची माहिती दिली होती. त्यावर ते मला म्हणाले होते की सगळं काही ठिक होईल,”

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून आमदांना जी नोटीस देण्यात आली त्यासंदर्भात गेल्या शुक्रवारी या प्रकरणातील युक्तिवाद अपूर्ण राहिला होता. यामुळे पुढील कारवाईला 21 जुलैला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयात दोन्ही पक्षांच्या सहमतीने पुन्हा आज (सोमवारी) सकाळी 10 वाजता सुनावणी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

गणेशोत्सव: चाकरमान्यांसाठी दिलासा, एसटीने कोकणात जाण्यास सशर्त परवानगी

कोरोनाच्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भूमिपूजनाचा घाट – थोरात

दूध दरासंदर्भात मंत्रालयात उद्या बैठक;बळीराजाला मायबाप सरकारकडून मोठी आशा

शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही, उमा भारतींचा जोरदार टोला

सोमवारपासून लागू होणार ‘हा’ नवा कायदा,ग्राहकांना होणार थेट फायदा