‘मला आंदोलनाची सवय नव्हती पण, महाविकास आघाडी सरकारमुळे तीही लागली’

Pritam Munde

बीड : मला आंदोलनाची सवय नव्हती मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमुळे आंदोलनाची सवय लागली, असे मत खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी व्यक्त केले. बीड जिल्हाधिकारी कार्यासमोर भाजपच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनात त्यांनी ही कबुली दिली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वात या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने मदतीची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे या देखील उपस्थित होत्या. या वेळी खासदार मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच टीका केली.

बीडच्या पालकमंत्र्यांना परळीच्या बाहेर बीड जिल्हाच माहिती नव्हता. मात्र, अतिवृष्टीमुळे त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या बांधावर का होईना, बीड जिल्हा तरी पाहिला अशी खोचक टीकाही खासदार प्रीतम मुंडे यांनी केली. पालकमंत्र्यांच्या या निमित्ततरी बीड जिल्ह्यातील बातम्या छापून आला असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या