पेट्रोलचे भाव वाढल्याने मी सुद्धा अस्वस्थ ! -पंकजा मुंडे

पुणे: आम्ही विरोधात असतानाही पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यावर अस्वस्थ वाटायचं. आजही भाव वाढल्यावर अस्वस्थ वाटत असल्याचं म्हणत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पेट्रोल दरवाढी वर चिंता व्यक्त केली आहे, तसेच पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः आग्रही असल्याचंही त्यांनी सांगितल. मोदी सरकारला सत्तेत येऊन ४ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने पुण्यात पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मोदी सरकारच्या ४ वर्षपूर्ती निमित्त आज भाजपकडून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे, पंकजा मुंडे यांनी देखील पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत ४ वर्षाच्या कामगिरीचा पाढा वाचून दाखवला

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मोदी सरकारला आज ४ वर्ष पूर्ण झाली आहेत, आजच्या दिवशीच ऐतिहासिक विजय मिळवत मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. स्वच्छ भारत मशीनमुळे महिलांना आरोग्याची हमी मिळाली आहे. गरिबांना बँकिंग व्यवस्थेत आणण्याचे काम जनधन योजनेद्वारे करण्यात आले. केवळ १२ रुपयांत विमा योजना सुरू करण्यात आली, डीबीटीमुळे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. पहिल्यांदा ५० टक्के नुकसान झाल्यावरच पीकविमा दिला जात होता, आज ३४ टक्के नुकसान झाले तरी लाभ मिळतो आहे.

You might also like
Comments
Loading...