मी सायलेंट होतो पण मोदींसारखा घाबरत नव्हतो : मनमोहनसिंग

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यातील प्रचाराची शुक्रवारी सांगता झाली. यावेळी भाजप कडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. त्यामुळे ही पत्रकार परिषद लक्षणीय ठरली.

या पत्रकार परिषदेमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले. त्यामुळे आता मोदी-शहा पत्रकार परिषदेवर मोठ्या प्रमाणात टीका टिपण्णी होताना दिसत आहे. तर आता माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देखील मोदींच्या मूक पत्रकार परिषदेवर टीका केली आहे.लोक जरी मला सायलेंट पीएम असे म्हणत असले तरी मी मोदींसारखा घाबरट नव्हतो. असे म्हणत त्यांनी मोदींना टोला लगावला आहे. मनमोहनसिंग चेंजिंग इंडिया या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

Loading...

यावेळी मनमोहनसिंग म्हणाले की, जरी मला सायलेंट पीएम असे म्हणत असले तरी मी मोदींसारखा घाबरट नव्हतो. तसेच नागरिक म्हणतात, मी सायलेंट पीएम आहे. या पुस्तकातून माझे व्यक्तिमत्व तुम्हाला कळेल. पत्रकारांच्या प्रश्नांपासून पळून जाणारा मी पंतप्रधान नव्हे. पत्रकारांशी मी सतत संवाद साधत होतो. प्रत्येक परदेश दौऱ्यानंतर मी दौऱ्याविषयी माहिती देत होतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपचा 'हा' डॅशिंग आमदार उतरला मैदानात
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील