मुंबई – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा मुंडे या काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये चर्चेत होत्या. करुणा या दि. ५ सप्टेंबर रोजी परळीत दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावरच गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. करुणा मुंडे यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास 16 दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून जामिनावर सुटका झाली आहे.
सुटका झाल्यानंतर त्यांनी त्यावेळी माध्यमांशी बोलणे टाळले होते मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा फेसबुकवर लाइव्ह करत विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. माझ्या नावाचा उल्लेख करुणा शर्मा असा न करता माझ्या पतीच्या आडनावाने म्हणजेच करुणा धनंजय मुंडे असा करावा अशी माध्यमांना विनंती केली आहे.
पतीचे नाव किंवा आडनाव हा स्त्रीसाठी एक स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट असते. गेल्या ८-९ महिन्यांपासून माझी ही लढाई सुरु आहे. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे पुरावे आहेत. माझ्या पतीनेच न्यायालयात हे मान्य केले आहे की मी त्यांची पत्नी आहे. आणि त्यांच्यापासून मला दोन मुलं आहेत असं त्या म्हणाल्या आहेत.
पोलीसदेखील माझ्यावर जेव्हा गुन्हा दाखल करत होते तेव्हा ते करुणा शर्मा या नावानेच गुन्हा दाखल करत होते त्यावेळी मी त्यांना सुद्धा हे समजावून सांगितले की, केस करायची असेल तर जरूर करा मात्र नाव तरी बरोबर लिहा. पुन्हा जे होईल ते सर्व तुमच्यावरच येईल. पोलीस बंधूना देखील माझी विनंती आहे की कुणावरही खोटी केस दाखल करू नका. मग पुढे त्यांनी केस दाखल करताना करुणा मुंडे असा उल्लेख केला.
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खानला दिलासा नाहीच; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
- ‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या
- सर्वधर्मीय धार्मिक स्थळांना भेटी देऊन मंत्री छगन भुजबळ यांची कोरोनामुक्तीसाठी प्रार्थना
- ‘वसुलीसाठी सरसावणारे हात मदतीसाठी मागे येतात’, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- … तर एकही चेंडू न खेळता मुंबई इंडियन्स आयपीएलमधून पडू शकते बाहेर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<