पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात आज २२ मे रोजी (रविवारी) सभा होत आहे. यावेळी त्यांनी आपल्या अयोध्या दौऱ्यामागील कारण स्पष्ट केले. ज्या दिवशी आपण लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली, तेव्हा पुण्यात अयोध्येला जाण्याची तारीख जाहीर केली. त्यानंतर काही दिवसांतच हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही वगैरे. मी सगळं पाहात होतो काय चाललंय ते. मला मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. एक वेळ अशी आली की मला लक्षात आलं की हा सापळा आहे. आपण या सापळ्यात अडकायला नको. कारण या सगळ्या गोष्टींची रसद महाराष्ट्रातून सुरू झाली. असे राज ठाकरे यांनी म्हटले.
ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली, असे अनेक जण होते. त्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून आराखडा आखला गेला. मी एकाच गोष्टीचा विचार केला. मी अयोध्येला जाणार, याचा जो विचार मनात होता.. रामजन्मभूमीचं दर्शन घेणं आलंच. पण मला वाटतं तुमच्यापैकी अनेकजण तेव्हा जन्मालाही आले नसतील. तेव्हा आजच्यासारखे चॅनल्स नव्हते. तेव्हा फक्त दूरदर्शन हे एकच चॅनल होतं. तेव्हा दूरदर्शनवर न्यूज रील्स चालवायचे. मला आजही आठवतं जेव्हा मुलायमसिंह सरकार उत्तर प्रदेशात होतं, भारतातून सर्व ठिकाणाहून कारसेवक अयोध्येला गेले, तेव्हा आपल्या सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं. त्या सर्व कारसेवकांची प्रेतं शरयू नदीत तरंगताना मी पाहिली होती. मला राम जन्मभूमीचं दर्शन घ्यायचं होतंच, पण जिथे माझे कारसेवक मारले गेले, त्या जागेचंही दर्शन मला घ्यायचं होतं. असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राजकारणात भावना अनेकांना समजत नसतात. पण ज्या प्रकारचा माहौल तिथे उभा केला जात होता मी उद्या जर तिथे जायचं ठरवलंच असतं, तर महाराष्ट्रातून अनेक बांधव तिथे आले असते. तिथे जर काही झालं असतं, तर आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या, जेलमध्ये सडवलं गेलं असतं आणि हकनाक काही कारण नसताना तो ससेमिरा तुमच्या पाठिशी लावला असता. म्हटलं मी आपली पोरं हकनाक घालवणार नाही अशी. या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर देखील केसेस टाकल्या असत्या आणि ऐन निवडणुकीच्या वेळी इथे कुणीच नसतं. हा सगळा सापळा होता. असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या:
- “मटणकरी नाही, तो तर थ्री इडियट्स मधला सायलेन्सर”, ‘मनसे’चा अमोल मिटकरींवर निशाणा
- “उद्धव ठाकरेंमध्ये नाही तर राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब दिसतात” – गजानन काळे
- अजित दादाने भाजपसोबत छय्या छय्या केले, तुम्ही फोने बंद करून ठेवले; मनसेचा धनंजय मुंडेंना टोला
- “गॅस सिलेंडर कमरेला बांधा, डिझेल-पेट्रोल काखेत घ्या…”, सदाभाऊंचा महाविकास आघाडीवर निशाणा
- मोदींनी पेट्रोलचे दर कमी केल्यानंतर नवनीत राणांचे ठाकरे सरकारला ‘हे’ आवाहन
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<