‘सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा’

sadabhau khot raju shetti

ठाणे:- केंद्र सरकारच्या जाचक नव्या कृषी कायद्यांविरोधात राजधानीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं गेल्या 48 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. काल आंदोलक आणि कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. वरिष्ठ वकील प्रशांत भूषण आणि दुष्यंत दवे शेतकऱ्यांची बाजू कोर्टात मांडली. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत अनेक बैठकी पार पडल्या. परंतु, या बैठकींमध्ये शेतकरी आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही.

केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयानंही कडक भूमिका घेतलीय. केंद्र सरकारनं या कायद्यांना स्थगिती द्यावी अन्यथा सर्वोच्च न्यायालयाकडून या कायद्यांना स्थगिती देण्यात येईल, असंही सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी म्हटलंय.

दरम्यान, या कायद्याच्या विरोधात महाराष्ट्रभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलन केले आहे. त्यांच्या या आंदोलनावर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. एकीकडे सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहून आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा, अशी दुटप्पी भूमिका काही पक्षातील नेते करत आहेत. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली.

महत्वाच्या बातम्या