‘..तर भाजपची दरवाजे मला उघडी आहे’, असे मुख्यमंत्र्यांना सुचवायचे असेल

मुंबई : राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होईल, या चर्चेला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. मात्र, या वेळी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संबंधी सूचक वक्तव्य केले आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमीपूजन समारंभात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा उल्लेख करतांना त्यांनी रावसाहेब दानवे यांना उद्देशून आमचे माजी आणि आजी सहकारी असे म्हणत, या चर्चेला सुरूवात करुन दिली आहे. आता त्यावरच भाजपकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला प्रतिउत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीका-टिपण्णी करण्याची सवय आहे. काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘माजी मंत्री म्हणून उल्लेख करू नका असे विधान केले होते. यावरच त्यांनी टीका स्वरुपात हे विधान केले असावे असे दरेकर यांनी म्हटले आहे. किंवा महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आंतरिक कुरघोडी सुरु असतील, त्यांनाच इशारा म्हणून त्यांना सांगायचे असेल की, अशा कुरघोडी सुरूच ठेवल्या तर मला भाजपचे दार उघडे आहे.’ असे त्यांना सुचवायचे असेल असेही ते यावेळी म्हणाले आहेत. पण राजकारण अशा वक्तव्यांवर होत नसते. असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे म्हणतांना त्यांनी मागे वळून पहिले.’ त्यांच्या या वक्तव्याने आता राजकीय चर्चांना उधान आले आहे. तर मुख्यमंत्र्यांचा भाजपमध्ये परत येण्याचे मन असू शकते अशी शक्यताही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. ते पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या