जालना : परशुराम जयंतीच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलत असतांना भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मी ब्राम्हणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो, असे वक्तव्य केले आहे. रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
यावेळी बोलत असताना रावसाहेब दानवे म्हणाले की,‘नेतृत्व हे समाजाला एकसंघ ठेवणारं असलं पाहिजे. त्यामुळे ब्राम्हणाला मी केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झालेलं पाहू इच्छित नाही. तर या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो’, असे दानवे म्हणाले.
दरम्यान, आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील किनगावकर यांनी केली. तसेच यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, डॉ. संजय राख, भाजपचे भास्कर दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, दीपक रणनवरे, संजय देठे, रामेश्वर पाटील भांदरगे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
- “…हेच का तुमचे न सोडलेले ज्वलंत हिंदुत्व..?”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची टीका
- “…क्षितिजावर पोहचणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही”, मनीषा कायंदेंचा फडणवीसांवर निशाणा
- “MNS नंतर शिवसेना सभा घेणार असेल तर AIMIM…”, इम्तियाज जलील यांचा इशारा
- “आली रे आली महाचोरांच्या आघाडीला केराची टोपली…”, सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र
- इतकी असहायता का?; ‘त्या’ हल्ल्याप्रकरणी मोहित कंबोज यांचा आयुक्त संजय पांडे यांना सवाल