राष्ट्रपतींची भेट घेऊन मला एक खून माफ करा अशी विनंती करणार – राज ठाकरे

raj-thackeray

नाशिक : . मी आता राष्ट्रपतींची भेट घेऊन मला एक खून माफ करा अशी विनंती करणार आहे. हे वक्तव्य केलय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी.

‘मोबाइल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे राज्यातील तरुणांची खरी ताकद वाया जात आहे. मला कोणी भेटायला आले तर तो कामाऐवजी पहिले सेल्फी किंवा फोटो काढण्याची विनंती करतो. लोक बोलायचं सोडून फोटोच काढत बसतात. या साऱ्या प्रकाराला मी वैतागलोय. मी आता राष्ट्रपतींची भेट घेऊन मला एक खून माफ करा अशी विनंती करणार आहे. हा खून मोबाइल कॅमेरा बनवणाऱ्याचा असेल,’ असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलाय.

राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान हे वक्तव्य केलय.Loading…
Loading...