मला आई होण्याची इच्छा आहे – प्रियांका चोप्रा

टीम महाराष्ट्र देशा : बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रीचं लग्न झाल की काही महिन्यानंतर त्यांच्या गर्भवती असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगत असतात. अशीच चर्चा आता प्रियांका चोप्रबाबतही रंगली आहे आणि विशेष म्हणजे आई होण्याची इच्छा तिने स्वतःच व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तिने आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियांकाच्या लग्नानंतर तिच्या गर्भवती असल्याची चर्चा होऊ लागल्यानंतर प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी प्रियांका गर्भवती नसल्याचं स्पष्टीकरणही दिलं होतं. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियांकाने तिच्या काही इच्छांचा खुलासा केला. तिला आई व्हायचं आहे, घर खरेदी करायचं आहे. या आणि अशा अनेक इच्छा असल्याचं तिने याप्रसंगी सांगितलं. ती म्हणाली, ”माझ्या काही इच्छा आकांक्षा आहेत. या गोष्टींविषयी मी आधी फारसा विचार केला नव्हता. पण आता करतेय. मला आई होण्याची इच्छा आहे. त्यासोबतच मला एक घरदेखील खरेदी करायचं आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये मी घर घेण्याचा विचार केला नव्हता. फक्त बॅग घ्यायचे आणि इथून-तिथे फक्त प्रवासच करायचे, ” असे तिने यावेळी सांगितले.

याशिवाय , ‘मी एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण करतेच. जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी काही गोष्टींचा त्यागही करावा लागतो. या जगात कोणतीच गोष्ट सहज आणि फुकट मिळत नाही. मेहनत, निश्चय आणि त्याग या गोष्टींचा अवलंब केला की, आपल्याला हवी असलेली गोष्ट नक्कीच मिळते.” अश्या भावनाही तिने व्यक्त केल्या.

दरम्यान, सध्या प्रियांका शोनाली बोस दिग्दर्शित ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या