सनी लिओनीकडून  गोड बातमी ऐकायला मिळाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

वेबटीम : अभिनेत्री सनी लिओनी तिच्या खासगी तसेच व्यावसायिक आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. पण, सध्या सनी तिच्या एका वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आलीये.‘स्पॉटबॉय’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सनीने सांगितले की आता तिला आई व्हायचे वेध लागले आहेत.
सनीच्या बोलण्यावरुन तरी ती एखादे मुल दत्तक घेईल किंवा सरोगसी पद्धतीचा वापर करेल असेच चिन्ह आहेत. सरोगसीबद्दल तिला अधिक विचारले असता ती म्हणाली की, ‘मी सरोगसीबद्दल खात्रीने काहीत बोलू शकत नाही. खरेतर मला याबद्दल माहित नाही. परमेश्वर तुम्हाला अनेक क्षण देत असतो. यातील एक क्षण तुम्हाला पकडायचा असतो. या सगळ्यामध्ये मला आई व्हायचे आहे ही एकच गोष्ट खरी आहे,’ असे ती म्हणाली
 ‘सध्याच्या कामांच्या व्यापामुळे शारिरीकदृष्ट्या आई बनणं कठीण वाटतंय. व्यावसायिक पातळीवर माझ्या आयुष्यात सध्या खूप गोष्टी घडत आहेत. पण भविष्यात काय होईल कोणाला माहित. कोणास ठाऊक, काही दिवसांत माझ्या हातात तुम्हाला माझे बाळ दिसेल आणि सगळ्यांना धक्का बसेल. शेवटी हे बाळ आले कुठून, असा प्रश्न सगळ्यांना पडेल,’ असे सनी म्हणाली.
सनीच्या बोलण्यातून ती आई व्हायला किती उत्सुक आहे ते कळतेच त्यामुळे भविष्यात जर तिच्याकडून एखादी गोड बातमी ऐकायला मिळाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.