औरंगाबाद : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या मालिका सुरू आहेतच. अशातच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. औरंगाबाद मध्ये शिवसेनेने शक्ती प्रदर्शन करण्यासाठी वाहन रॅली काढली होती. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली आहे.
शिवसेनेतून बंड पुकारलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेत आणलं अशा प्रकारचं खळबळ जनक विधान चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. “जेव्हा मी सिल्लोडमध्ये भाषण करायचो तेव्हा मी त्यांना जाहीर सभेत हिरवा साप म्हणायचो. मात्र आता ते रंग बदलणारा काळा सरडा झाले आहेत” अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केली आहे.
त्याचबरोबर बंडखोर आमदार तिथे जाऊन ऐशोआरामात राहत आहेत. झाडे आहेत, डोंगर आहेत, पाणी आहे असं सांगत आहेत. पण इथं लोकांना अनेक ठिकाणी प्यायला पाणी देखील नाही. तलाव रिकामे पडले आहेत. काही ठिकाणी शेतकरी त्यांच्या मतदारसंघाला त्रासले आहेत असं खैरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर आपण का गेला नाहीत असा सवाल चंद्रकांत खैरे यांना माध्यमांनी विचारला. यावर आम्ही बंडखोरांच्या कार्यालयावर गेलो होतो पण पोलिसांनी जाण्यास मनाई केली असे स्पष्टीकरण खैरे यांनी दिलं. सेना स्टाईल ने आम्ही त्यांना दाखवून देऊ असा इशाराही खैरे यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Arjun-Malaika : ‘या’ कारणांमुळे अर्जुन कपूर गर्लफ्रेंड मलायकाला म्हणाला चोर
- Nilesh Rane : “हा संपला तो संपला म्हणणारे स्वतःच संपले”, निलेश राणेंनी ‘मविआ’ला डिवचले
- Eknath Shinde : “उद्या बहुमत चाचणीत…” ; कामख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया!
- Amol Mitkari : “बहुमत चाचणीचा आदेश एका रात्रीत कसा निघतो, नक्कीच…” ; अमोल मिटकरींचा राज्यपालांना खोचक सवाल
- Supreme Court : मलिक-देशमुखांची कोर्टाकडे फ्लोर टेस्टला उपस्थित राहण्याची मागणी; आज होणार सुनावणी
>>> TOP CATEGORIES - राजकारण । क्रीडा बातम्या । कृषी बातम्या । आरोग्य बातम्या | मनोरंजन बातम्या । नोकरी बातम्या । मुंबई बातम्या । पुणे बातम्या । औरंगाबाद बातम्या । नाशिक बातम्या। नागपूर बातम्या । व्हिडीओ बातम्या । Trending News <<<
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<