तेव्हा मला असं वाटतंं की, मी कैलास मानसरोवरची यात्रा करावी- राहुल गांधी

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर आपली मंदिर डिप्लोमसी सुरुच ठेवली आहे. कैलास मानसरोवरची यात्रा करण्याबाबत राहुल गांधी वक्तव्य केले.

राहुल गांधी म्हणाले, ‘मी जेव्हा विमानाने कर्नाटकला चाललो होतो त्यावेळी माझं विमान अचानक ८००० फूट खाली आलं. ज्यावेळी मी सुखरुप असल्याची मला जाणीव झाली त्यावेळी मला असं वाटलं की, मी कैलास मानसरोवरची यात्रा करावी.’ असे म्हणत राहुल गांधी यांनी आपली मंदिर डिप्लोमसी सुरुच ठेवली आहे.

दरम्यान, राहुल गांधी कैलास मानसरोवर यात्रेला गेल्यास त्यावर राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. यंदा होणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला जाणार असल्याचं राहुल गांधींनी जाहीर केलं आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर जनआक्रोश रॅलीमध्ये राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कर्नाटक निवडणुकीनंतर मानसरोवर यात्रेसाठी १५ दिवसांची सुट्टी मागितली आहे.