‘कॅप्टन होईल वाटले होते, पण…’ ; युवराज सिंगचा खुलासा

कॅप्टन

मुंबई : भारताचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंगने  नुकतंच कॅप्टन होण्याची इच्छा होती असे बोलून दाखवली. युवराज सिंगने त्याच्या कारकिर्दीत बरेच कारनामे केले. तसेच टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2011 मध्ये देखील युवराजने महत्वाची भूमिका बजवली होती. मात्र, सातत्याने उत्तम कामगिरी करूनही तो कधी टीम इंडियाचा कॅप्टन झाला नाही.

युवराजने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. युवराजने एका मुलाखतीत आपल्याला कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, असा खुलासा केला आहे. दक्षिण आफ्रिकेत 2007 साली झालेल्या पहिल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये आपल्याला कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, पण महेंद्रसिंह धोनीचे कॅप्टन म्हणून नाव जाहीर झाले असे युवराज सिंगने सांगितले आहे.

युवराज म्हणाला, ‘भारताचा त्यावर्षी झालेल्या 50 ओव्हर्सच्या वर्ल्ड कपमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे टीम इंडियामध्ये बऱ्याच घटना घडत होत्या. इंग्लंड आणि आयर्लंडमध्ये या देशांचा दोन महिन्यांचा दौरा होता. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत टी 20 वर्ल्ड कप होणार होता. त्यावेळी टीममधील सीनियर्सनी ब्रेक घेण्याचे ठरवले होते.कुणीही टी 20 वर्ल्ड कप गांभीर्याने घेतला नव्हता. मला मात्र त्यावेळी कॅप्टन होईल असे वाटले होते, पण धोनीच्या नावाची कॅप्टन म्हणून घोषणा झाली.’ असे युवराजने सांगितले आहे. महेंद्रसिंह धोनी कॅप्टन झाल्यानंतर त्याच्यात आणि आपल्या संबंधांमध्ये याचा कोणताही परिणाम झाला नाही असेदेखील युवराजने सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP