मोदींने मानले महाराष्ट्रातील जनतेचे मराठीतून आभार

टीम महाराष्ट्र देशा : भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्याने नरेंद्र मोदी महारष्ट्र भाजप वर जाम खुश झाले आहेत. विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत ट्विट करणाऱ्या पंतप्रधानांनी आता ग्राम पंचायत निवडणुकीतील यशाबद्दलही ट्विट केलं आहे.

भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे आभार असं ट्विट मोदींनी केलं आहे. “राज्यभरातील ग्राम पंचायतींमध्ये भाजपला यश मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे मन:पूर्वक आभार” असं मोदी म्हणाले. याशिवाय मोदींनी महाराष्ट्र भाजपचंही कौतुक केलं आहे.