fbpx

‘मी प्रत्येक सभेत महाराष्ट्रातील चोरांबाबत बोलतो’

टीम महाराष्ट्र देशा – मी प्रत्येक सभेत महाराष्ट्रातील चोरांबाबत बोलतो ज्यांनी राज्याला, राज्यातील जनतेला पार डुबवलं असल्याची जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर केली. जिंतूर येथील राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते.

मला इथल्या परभणीतील चोराबाबतही बोलण्याचा आग्रह लोकांनी धरलाय. मगर हम इतने गिरे हुए चोरोंका नाम भी नही लेते, असही मुंडे यावेळी म्हणले.

यावेळी मुंडे म्हणाले की, बोंडआळींना अनुदान घोषित करून दीडकी न दिलेल्या सरकारवरील शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मनातून उतरलं आहे, सत्तेतून पण उतरणारच.

मी प्रत्येक सभेत महाराष्ट्रातील चोरांबाबत बोलतो ज्यांनी राज्याला, राज्यातील जनतेला पार डुबवलं आहे.मला इथल्या परभणीतील चोराबाबतही बोलण्याचा आग्रह लोकांनी धरलाय. मगर हम इतने गिरे हुए चोरोंका नाम भी नही लेते, असं म्हणत मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.