मला कधी कधी प्रश्न पडतो ह्याचं नाव ह्याच्या बापाने ‘गुलाब’ काय म्हणून ठेवलं असेल

blank

टीम महाराष्ट्र देशा : मला कधी कधी प्रश्न पडतो ह्याचं नाव ह्याच्या बापाने गुलाब काय म्हणून ठेवलं असेल असा ट्वीटर च्या माध्यमातून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली आहे, ती भाजपचे नेते आणि माजी निलेश राणे यांनी.राणे यांनी गुलाबराव पाटलांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

गुलाबराव पाटील यांनी मनसे हिंदुत्वाच्या मुद्यावर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करू पाहत असलं तरी हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा लावून धरला होता. तेव्हापासून प्रत्येक शिवसैनिक औरंबगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर म्हणूनच करीत आहे. त्यामुळे आमचं उष्ट कोणी खाऊ नये, असं वक्तव्य केलं आहे.या गुलाबारावांच्या वक्तव्यावर निलेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

यावर निलेश राणे यांनी सेनेवर सरळ निशाणा साधत आणि गुलाबराव पाटलांचे नाव घेत ‘सेनेवाले काँग्रेस राष्ट्रवादीचं शेण खतायत ते चालतं…. मला कधी कधी प्रश्न पडतो ह्याचं नाव ह्याच्या बापाने गुलाब काय म्हणून ठेवलं.अशा शब्दात ट्वीट केलं आहे.आता यावर राजकारण पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.