हो मी चहा विकला, देश नाही विकला – नरेंद्र मोदी

गुजरात मधील वातावरण तापू लागले

टीम महाराष्ट्र देशा – ‘माझ्या गरिब पार्श्वभुमीमुळे काँग्रेस मला नापसंद करतं. एखादा पक्ष इतका खालच्या स्तराला जाऊ शकतो का ? हो गरिब कुटुंबातील एक व्यक्ती पंतप्रधान झाला आहे. यावरुन झालेला संताप ते लोक लपवू शकलेले नाहीत. हो मी चहा विकला, देश विकलेला नाही’, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. गुजरातमधील राजकोटमध्ये प्रचारसभेत ते बोलत होते.

चहा विकण्यावरुन काँग्रेस पक्षाकडून खिल्ली उडवण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेदरम्यान काँग्रेसवर सणसणीत टीका केली आहे. हो मी चहा विकला, पण देश नाही विकला अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला सुनावलं आहे. आपण गरिब कुटुंबातून असल्यामुळे काँग्रेस पक्षातील नेते नेहमीच आपला तिरस्कार करतात अशी टीकाही नरेंद्र मोदींनी केली आहे.