‘मी ते अ‍ॅप पाहिले होते’; राज कुंद्रा प्रकरणावर मिका सिंगची प्रतिक्रिया

मिका सिंग

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर अनेक बॉलीवूड कलाकारांनी यावर आपले मत मांडले आहे, यातच आता गायक मिका सिंगने देखी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एका माध्यमाशी बोलताना मिका सिंग म्हणाला, ‘ काय होतय हे पाहूयात. जे काही होणार ते चांगलेच होणार. मला त्याच्या अ‍ॅपविषयी फार काही माहिती नाही. मी ते अ‍ॅप पाहिले होते. ते एकदम सिंपल अ‍ॅप होते. त्या अ‍ॅपमध्ये फार काही नव्हते. त्यामुळे जे काही होईल ते चांगले होईल अशी अशा आहे. माझ्या माहितीप्रमाणे राज कुंद्रा खूप चांगला व्यक्ती आहे. काय खरं आणि काय खोटं आहे हे कोर्टच आपल्याला सांगू शकते.’ असे मिकाने म्हणत राजला पाठिंबा दर्शवला आहे. 1

राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला काल सकाळी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP