विधानसभेत आज ‘कॉमेडी सम्राट’ पाहिला,’कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री’ : नितेश राणे

nitesh vs uddhav

मुंबई : ‘आज एक ‘कॉमेडी सम्राट’ विधानसभेत पाहिला आणि ऐकला…महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही! “कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री” असे ट्वीट भाजपचे नेते नितेश राणे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच सुधीर मुनगंटीवर यांनी केलेल्या भाषणाची  “नटसम्राट पाहातोय की काय” अशी टीका केली होती. ठाकरेंच्या याच टीकेचा धागा पकडून नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचं भाषण ‘कॉमेडी सम्राट’ भाषण असल्याचं म्हटलंय.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या आरोपांना आणि टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. पण मुख्यमंत्र्यांचे भाषण विधानसभेतले नसून चौकातलं भाषण होतं, असं वक्तव्य राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

दरम्यान यावेळी काही सदस्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकरी उल्लेख केला यामुळे ठाकरे यांनी त्याचं भाषण काही काळ थांबवल होत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली, ‘उद्धव ठाकरे हे विशिष्ट पक्षाचे जरी असले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री पद हे सन्मानीय पद आहे यामुळे जर कोणी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.’ असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

IMP