राज ठाकरेंच्या प्रेरणेनं मी राजीनामा दिला : जोशी

टीम महराष्ट्र देशा : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण आयोजकांनी रद्द केले होते,त्यावरून श्रीपाद जोशींवर अनेकांनी टीका केली होती.आता जोशींनी विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर आपला राजीनामा पाठविला आहे. श्रीपाद जोशी यांनी आपल्या राजीनाम्यामागे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रेरणा असल्याचं म्हटलं आहे. साहित्य संमेलनातील गोंधळाचा हा ‘प्लॉट’ नेमका कुणी रचला याचा शोध घ्या, असं आवाहनही जोशी यांनी केलं आहे.

Loading...

नेमकं काय म्हटलं आहे श्रीपाद जोशी यांनी ?
‘हा वाद मनसेच्या एका छोट्या कार्यकर्त्यानं संमेलन उधळण्याची धमकी दिल्यामुळं सुरू झाला होता. त्या कार्यकर्त्याचं कृत्य आपल्या अंगावर घेऊन राज यांनी माफी मागितली. मनाचा मोठेपणा दाखविला. मी देखील तसंच केलं, असं सांगून, दुसऱ्याच्या चुकीची जबाबदारी आपण घेत असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवलं. आयोजकांनी मला खलनायक आणि दहशतवादी ठरवलं. हे सगळं अत्यंत वेदनादायी होतं. हे सगळं का झालं याचा शोध घ्या.Loading…


Loading…

Loading...