राहुल गांधींवरुन पूनावाला बंधूंमध्ये वाद;तहसीन यांनी भाऊ शहजादसोबतचं नातं तोडलं

कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणूक :'यह सिलेक्शन है, इलेक्शन नही'- शहजाद पूनावाला

मुंबई – राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे हातात घेण्याआधीच पक्षातून पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या विरोधात सूर उमटायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव शहजाद  पूनावाला यांनी राहुल गांधींच्या निवडीबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहे. ते म्हणाले, ‘यह सिलेक्शन है, इलेक्शन नही’. या निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप शहजाद यांनी केला आहे.

काय म्हटलंय शहजाद पूनावाला यांनी ?
अध्यक्षपद राहुल गांधींना मिळावे यासाठी हेराफेरी केली जात आहे. या निवडणुकीत मते टाकणाऱ्या उमेदवारांची नावे फिक्स आहेत. यात गैरप्रकार होत आहे. पूनावाला यांनी एका ट्वीटमध्ये लिहिले, यह सिलेक्शन है, इलेक्शन नही. ते गांधी कुटुंबातील असल्याने तेच अध्यक्ष बनतील असेही पुनावाला यांनी म्हटले आहे. पुनावाला यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, मी असा मुद्दा उचलत आहे जो उचलण्याची पक्षात कोणातही हिम्मत नाही, हे मला माहिती आहे. घराणेशाहीवर मी शांत बसू शकत नाही. त्यांनी भाऊ तहसीन पुनावालाला टॅग करत लिहिले की, त्याला याबाबत काहीही माहिती नाही, नसता, त्याने मला याबाबत बोलू दिले नसते.

तहसीन यांनी भाऊ शहजादसोबतचं नातं तोडलं?
यानंतर तहसीन पूनावाला यांनी शहजाद यांच्यावर तोफ डागली. राहुल यांच्यावर केलेली टीका अत्यंत खेदजनक प्रकार आहे, त्यामुळे आपण व्यथित झाल्याचं तहसीन यांनी म्हटलं. शिवाय आजपासून आपण शहजादशी भाऊ म्हणून असलेलं नातं तोडत असल्याचंही त्यांनी ट्विटरवरुन जाहीर केलं. तहसीन पूनावाला काँग्रेसचे समर्थक असून ते रॉबर्ट वाड्रा यांचे मेहुणेही आहेत.

\

You might also like
Comments
Loading...