मी माझ्या सासुबाईंना कधीच ‘सासुबाई’ म्हटलं नाही ; मी नेहमी ‘आई’च म्हणते : अमिता चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा: आजच्या ‘व्हॅलेंटाईन दिनाचं’ औचित्य साधत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांची मुलाखत मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याने घेतली. यावेळी अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांनी अनेक विषयांवर दिलखुलासपणे बातचीत केली. तसेच त्यांनी आपल्या प्रेमाचाही उलगडा केला.अशोकच्या घरात पहिल्यापासूनच प्रेमाचं आणि खेळीमेळीचं वातावरण होतं. मी माझ्या सासुबाईंना कधीच सासुबाई म्हटलं नाही. मी नेहमी आईच म्हणते. त्यांनीही मला खूप सांभाळून घेतलं, असं त्यांनी सांगितलं.

तुम्ही अशोक चव्हाण यांच्यात कोणता गुण पाहिलात ज्यामुळे तुम्ही संसार थाटण्याचा निर्णय घेतला, असा प्रश्व रितेशने अमिता यांना विचारला होता. त्यावर अशोक चव्हाण यांच्यामधला प्रामाणिकपणा मला सर्वाधिक भावला अन् मी लग्नाचा निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं.

अशोक चव्हाण यांचे वडिल शंकरराव चव्हाण हे त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांच्या मुलाला डील करण्यात काही अडचण आली का? किंवा काही दडपण होतं का? या प्रश्नावर निश्चित दपडण होतं. पण प्रेमापुढे काय? आम्ही दोघांनीही घरच्यांना समजावलं आणि लग्नाचा निर्णय घेतला, असं अमिता यांनी सांगितलं.एकंदरीत आपल्या अनेक विषयावर त्यांनी सहज उत्तरे दिली .