मुंबई : बिग बॉस मराठी हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम घराघरांत प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. या पर्वातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण निर्माण केली आहे. यामध्ये आता बिग बॉस फेम पराग कान्हेरे सध्या त्याच्या फेसबुक पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.
परागने सध्या एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शन मध्ये लिहिले की, “तुमचे पुन्हा स्वागत बरका… मला टरबूज सलाद म्हणून खूप आवडतात…लोकांनी कितीही टीका केली तरी टरबूज हा शरीरसाठी चांगला असतो. सवयी बदला, जीवन बदलेल”, त्याची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे.
पराग सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्याची फेसबुक पोस्ट आता चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी त्याला ट्रोल करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. अनेकांनी त्याची ही पोस्ट राज्यातील राजकारणासंबंधी असल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<