भाजप नेते राम माधव यांच्या ट्विटर अकाऊंट वरून ‘आय लव्ह पाकिस्तान’ चे ट्विट

ram-madhav

टीम महाराष्ट्र देशा: भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव, अभिनेता अनुपम खेर, राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचे ट्विटर अकाऊंट तुर्किश आर्मी ग्रुप या ग्रुपने हॅक केल्याची माहिती समोर येते आहे. राम माधव यांच्या ट्विटर अकाऊंटमधली सगळी माहिती आमच्याकडे गोळा केली आहे. त्यांचे अकाऊंट आम्ही हॅक केले आहे. असा संदेश या ट्विटर अकाऊंटवर येतो आहे. तसेच I love pakistan असे लिहून हे अकाऊंट आम्हीच हॅक केले असल्याचे तुर्किश आर्मी ग्रुपने म्हटले आहे.

अकाउंट हॅक झाल्याचं समजल्यानंतर ट्विटरने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या तिघांचंही अकाउंट सस्पेंड केले. आय सपोर्ट तुर्की या नावाने देखील एक ट्विट करण्यात आले आहे. तसेच इतर अनेक ट्विट या ग्रुपकडून आता राम माधव यांच्या नावे टाकण्यात येत आहेत. तासाभरापूर्वीच एक रिट्विट राम माधव यांनी केल्याचे दिसते आहे त्यानंतरचे सगळे ट्विट मात्र तुर्किश आर्मी ग्रुपने पोस्ट केले आहेत. तसेच अभिनेते अनुपम खेर यांचेही ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची माहिती अनुपम खेर यांनी स्वतःच दिली आहे. रात्री मला काही मित्रांचे मेसेज आणि फोन आले त्यानंतर मला माझे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळाली आहे. स्वप्नदास गुप्ता यांच्याकडून मला एक लिंक आली ती मी उघडल्यावर माझे अकाऊंट हॅक झाल्याची माहिती अनुपम खेर यांनी स्पष्ट केली.

ram madhav

ram madhav 11

Loading...