fbpx

मी पाकिस्तानवर भारताइतकंच प्रेम करतो ; मणिशंकर अय्यरांना पुन्हा पाकिस्तानचा पुळका

mani-shankar-aiyar-

टीम महाराष्ट्र देशा: मी भारतावर प्रेम करतो म्हणूनच माझे पाकिस्तानवरही प्रेम आहे. भारतानेही शेजारधर्माचे पालन करून पाकिस्तानवर प्रेम करावे, असा संतापजनक सल्ला कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी दिला आहे. एकीकडे पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणारे हल्ले पाहता मणिशंकर अय्यरांच्या या वक्तव्याने नवा वाद उभा राहिला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा अखंडपणे सुरू राहणे, ही काळाची गरज आहे. याबाबत पाकिस्तानची सध्याची भूमिका सकारात्मक असली तरी भारताकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. परंतु, भारत-पाकिस्तान यांच्यातील वाद सोडवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यासाठी दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवरील चर्चा अव्याहतपणे सुरूच राहिली पाहिजे. अस मतही मणिशंकर अय्यर यांनी व्यक्त केल आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी कराची येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी हे संतापजन वक्तव्य केल आहे.

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेसला अडचणीत आणले होते. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपाला याचा फायदा झाला होता. त्यानंतर आता कर्नाटक विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर अय्यर यांचे नवे वक्तव्य पुन्हा एकदा काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते.

1 Comment

Click here to post a comment