उर्मिलाने फोडले स्थानिक नेत्यांवर पराभवाचे खापर

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करवा लागला. त्यात उत्तर मुंबई मतदारसंघाच्या कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना देखील युतीच्या उमेदवारा समोर दारूण पराभाचा सामना करवा लागला. त्यामुळे उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या पराभवाचे खापर स्थानिक नेत्यांवर फोडले आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून आपल्याला अपेक्षित मदत मिळाली नसल्याची तक्रार उर्मिला मातोंडकर यांनी मिलिंद देवरा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रात उर्मिला मातोंडकर यांनी पराभवाची कारण लिहिली आहेत. मी ही निवडणूक जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले, कष्ट घेतले. मात्र, मला पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून अपेक्षित मदत मिळाली नाही, असे उर्मिला यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. चुकीचे नियोजन, स्थानिक नेत्यांची पात्रता, आर्थिक मदतीतील कमतरता अशा अनेक कारणांमुळे पराभव झाला असल्याचे उर्मिला मातोंडकरने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उतरल्या होत्या. मात्र आता उर्मिला मातोंडकरला भाजप तसेच शिवसेनकडून पक्षप्रवेशाची ऑफर मिळाली असल्याचे समोर आले आहे. बरेच दिवसांपासून उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसवर नाराज असल्याने अशा चर्चांना उधान आलं आहे.