fbpx

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारावीशी वाटते : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा- कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका कार्यक्रमात बोलताना राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर उपरोधिक टीका केली. जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर टीका करतात, तेव्हा तेव्हा त्यांना मिठी मारावीशी वाटते, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी ?
भाजपा आणि आरएसएसकडून मला शिव्यांची लाखोली वाहिली गेली, हेच माझ्यासाठी राजकारणी म्हणून मोठं गिफ्ट आहे. ज्यावेळी ते मला शिव्या घालत असतात त्यावेळी मला त्यांना मिठी माराविशी वाटते. मोदींमध्ये आणि माझ्यामध्ये मतभेद आहेत. ते पंतप्रधानांसारखे वागत नाहीत मात्र, त्यामुळे मला त्यांचा राग येत नाही. उलट त्यांच मत मांडण्याचा मी त्यांना अधिकार दिला आहे.