राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यात मोठा धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे सुपुत्र आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत आज भाजपमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी निरंजन डावखरे यांनीही राष्ट्रवादीत होत असलेल्या कोंडमा-याला वाट मोकळी करून दिली. स्थानिक नेत्यांकडून काम करताना त्रास होत होता म्हणून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पवार हे मोठे नेते आहेत. तरी मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी इच्छा आहे. मुख्यमंत्री सातत्यानं माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच मी भाजपामध्ये प्रवेश केल्याचं यावेळी ते म्हणाले.

दरम्यान डावखरे यांनी आपला पक्षसदस्यत्वाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविला आहे. डावखरे यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला मोठा फायदा होणार असून, यामुळे पालघर ठाण्यामधील भाजपची वोट बँक आणखी मजबूत होणार आहे.Loading…
Loading...