निवृत्ती कधी घ्यायची हे मला चांगलचं कळतं – धोनी भडकला

blank

टीम महाराष्ट्र देशा : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी आपल्या क्रिकेटमधून निवृत्त होणार असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मला फलंदाजी आणि विकेटकिपिंग कशी करायची हे जितकं कळत तितकच निवृत्ती कधी घ्याची हेही कळतं, असे धोनी यांनी म्हंटले.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या फलंदाजीने आणि विकेटकिपिंगमुळे धोनीचे अनेक चाहते आहेत. मात्र यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत धोनीला हवी तशी कामगिरी होत नसल्याचे दिसत आहे.

दरम्यान धोनीच्या यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील संथ गतीच्या फलंदाजीमुळे महेंद्रसिंग धोनीने आता क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावी, अशा प्रतिक्रिया चाहते आणि क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. या चर्चेला धोनीने पूर्णविराम दिला आहे.

महेंद्रसिंग धोनीने आता क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावी असं म्हणणाऱ्या चाहत्यांना धोनीने प्रत्युत्तर दिले आहे. फलंदाजी कशी करायची, विकेटकिपिंग कशी करायची हे जितकं मला चांगलं कळतं, तितकंच मला निवृत्ती कधी घ्यायची हे ही कळतं, असे धोनीने म्हंटले आहे.