fbpx

शिवसेना कशी आहे हे मला माहीत आहे,नारायण राणेंची शिवसेनेवर टीका

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. किरीट सोमय्या हे चार्टर्ड अकाऊंटंट आहेत ते अभ्यासू आहेत, त्यांची कामगिरीही चांगली आहे. शिवसेना त्यांच्या उमेदवारीला विरोध करून राजकीय खेळी करत आहे अश्या शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

शिवसेना हा थापा मारणारा पक्ष आहे, शिवसेना कशी आहे हे मला माहीत आहे. काही झाले तरीही युती करणार नाही. युतीमुळे आमचे नुकसान झालं आहे, असं युती होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत उद्धव ठाकरे म्हणत होते. आता फक्त सत्तेसाठी युती करण्यात आली आहे. पाच वर्षांनी त्यांची भाषा बदलली आहे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने संतापलेले शिवसैनिक ईशान्य मुंबईमधून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीस विरोध करत आहेत. जर भाजपाने सोमय्या यांना उमेदवारी दिली तर शिवसेना त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करेल. अशी भूमिका शिवसैनिकांतर्फे घेण्यात आली आहे.

1 Comment

Click here to post a comment