fbpx

आपल्या देशाची लायकी काय ते मी अनुभलंय, पाकिस्तानी अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा – पुलवामा येथे जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४९ जवान शाहिद झाले.गेल्या दोन दशकातला हा सर्वात मोठा हल्ला होता.

इरफान खानसोबत ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटात काम केलेली पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानची जगात लायकी काय आहे हे मला कळलंय, ते मी अनुभवलंय असं म्हणत सबा या व्हिडिओमध्ये रडताना दिसत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आता सबाचा हा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सबाने काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने पाकिस्तानींना जगात कशी वागणूक दिली जाते, पाकिस्तानींची लायकी काय आहे याबाबत सांगितले होते. ‘आपण पाकिस्तानी असल्याने पाकिस्तान झिंदाबादचा नारा देतो. पण जेव्हा आपण दुसऱ्या देशात जातो. तेव्हा आपण पाकिस्तानी असल्यामुळे ज्या प्रकारे आपली तपासणी होते ते सांगूही शकत नाही. एकदा एका चित्रपटासाठी परदेशात गेले होते. तेव्हा चेकिंगच्यावेळी माझ्यासोबत असलेल्या भारतीय क्रूची फार तपासणी न करता त्यांना पाठवून दिलं. मला मात्रं त्यांनी बसवून ठेवलं. मी पाकिस्तानी म्हणून माझी ज्या प्रकारे तपासणी झाली ते फार लज्जास्पद होतं’, असं सांगत सबा ढसाढसा रडली आहे.