माझ्यावर आरएसएसचे संस्कार आहेत, मी पक्ष सोडणार नाही : पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : माझं व्यक्त होणं हे नैसर्गिक आहे. मी अनेक छटा राजकारणाच्या पहिल्या आहेत. मी अन्याय झाला असं मी कधीच म्हटलं नाही. पराभवानंतर मी जबाबदारी स्वीकारली होती. पराभवाविषयी मी नाराज नाही. माझा झालेला पराभव माझा पराभव आहे कुणाचा विजय नाही, असे भावना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांना त्यांच्या फेसबुकवर काही दिवसांपूर्वी केलेल्या पोस्टमुळे पंकजा मुंडे यांच्या बंडखोरी करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, असे विचारण्यात आले यावर त्या म्हणाल्या, बंड करण्यासाठी माझ्याकडे कोणताही कारण नाही. मात्र व्यक्त होणं आणि पक्षविरोधी असणं या दोन वेगळ्या बाबी, माझ्यावर आरएसएसचे संस्कार असताना पक्ष का सोडेन? असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी विचरला.

Loading...

तसेच पराभूत झाल्यावर इतक्या धावपळीत उद्धव ठाकरे यांनी मला फोन करून सांत्वन केलं. “तू पराभूत झाली याच वाईट वाटलं, पण काळजी करू नकोस” अस उद्धव ठाकरे बोलल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष चालावे अस मला वाटत तर आपण आता विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी अस देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
मंत्र्यांची तत्परता : वीरपत्नीच्या मदतीला धावले बच्चू कडू...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
मशिदींना हात लावल्यास रिपब्लिकन पक्ष मुस्लिमांच्या पाठीशी उभा राहील - रामदास आठवले