‘वडकुतेंंनी मला रोखण्यापेक्षा 70 वर्षात धनगर आरक्षण देता आलं नाही त्यांना रोखावं’

टीम महाराष्ट्र देशा – धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रालयाच्या गेटवर वाट अडवली. यावरून आता पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

रामराव वडकुते यांनी मला रोखण्यापेक्षा ज्यांना गेल्या 70 वर्षात धनगर आरक्षण देता आलं नाही त्यांना रोखावं, असं आव्हान पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.ते ज्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत त्यांनी का धनगरांना आरक्षण दिलं नाही, असा प्रश्नही त्यांनी वडकुते यांना केला आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आपल्या धनगर आरक्षणाच्या वक्तव्यावरुन यु टर्न घेतला असून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं देखील म्हटलं आहे.दरम्यान,भाजप धनगर समाजाच्या जोरावर सत्तेत आले पण त्यांना आता धनगरांचा विसर पडला आहे. हे सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे. उच्चवर्णीय समाजाला सरकार १० टक्के आरक्षण देते मग धनगर समाजाला का नाही, असा सवाल आमदार रामराव वडकुते यांनी उपस्थित केला

मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही’, ‘मंत्रालयाची पायरी चढणार नाही’… मंत्र्यांनो ! शब्दांचा खेळ करणे थांबवा. आरक्षण कधी देणार ते बोला. नाहीतर आज आम्ही मंत्रालयात अडवलं, उद्या सरकारमध्ये येण्यापासून ही जनताच तुम्हाला अडवेल असा टोला देतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

You might also like
Comments
Loading...