सरकार कॉंग्रेसच्या कृपेवर अवलंबून – कुमारस्वामी 

नवी दिल्ली – कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमचं कुमारस्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सरकार जनतेच्या नव्हे तर कॉंग्रेसच्या कृपेवर अवलंबून असल्याचं त्यांनी म्हंटल. तसेच कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला कॉंग्रेसची सहमती घेणे आता बंधनकारक असल्याचेही त्यांनी म्हंटले.

ते पुढे  म्हणाले की माझ्या पक्षाने एकट्याने सरकार बनवलेले नाही. मी लोकांना जनादेश मागितला होता. मी कोणाच्याही दबावात न येण्यासाठी जनादेश मागितला होता. पण आज मी काँग्रेसच्या कृपेवर आहे. मी राज्यातील साडेसहा कोटी लोकांच्या दबावात नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी कृषी कर्ज माफ करण्यास आपले प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. जर मी कर्ज माफ करण्यात असफल ठरलो. तर मी आपल्या पदाचा राजीनामा देईल, असं देखील त्यांनी म्हंटलं आहे.

You might also like
Comments
Loading...